श्रीं चे वर्षभरातील उत्सवाची माहिती
design

० नवरात्रमहोत्सव :

घटस्थापना ते विजयादशमी आश्विन शु ।। १ ते आश्विन शु ।। १०
पहाटे ५.१५ व रात्री ७.१५ आरती

दररोज -

सकाळी ९ वा. सप्तशती पाठ
दुपारी २ वा. देवीमहात्म्यपाठ (मराठी)
दुपारी ५ वा. भजन व प्रवचन
रात्री ९ वा. किर्तन, भारुडाचे कार्यक्रम.


५ वी माळ व ७ वी माळ कोल्हार व भगवतीपूर पाटलांच्या वतीने चोळी पातळ, फुलोरा, नैवेद्य, प्रसादाचा मान व गावकऱ्यांना पानसुपारी अष्टमीस यज्ञ (होमहवन)
नवमीस घट विसर्जन
दसऱ्यास श्रींची अलंकृत पुजा व सिमोल्लंघन

० कोजागिरी पौर्णिमा

मध्यरात्री पर्यंत भजन नंतर श्रींची आरती व दुधाचा महाप्रसाद

० यात्रामहोत्सव

पुर्ण एक महिनाभर यात्रा असलेले एकमेव देवस्थान. कोल्हार भगवतीपूर पौष शुध्द पौर्णिमा ते माघ शुध्द पौर्णिमा ते महाशिवरात्री
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी श्रींचा छबीना पालखी सोहळा, सायंकाळी ६।। ते ७ वा. सुरु होऊन रात्री ११।। ते १२ वाजेपर्यंत चालतो. छबीना मंदीरात पोहोचल्यानंतर रात्री शोभेच्या दारुची आतषबाजी.
दुसरे दिवशी
१) सकाळी ८ ते १२ कलाकारांच्या हजेऱ्या व त्यांना बिदागी वाटप
२) दुपारी २ वाजता नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या

० शहनाईवादन व आरती

रोज सायंकाळी ६.४५ वाजता "शहनाई वादन" व ७.१५ वाजता "श्रींची आरती"